अलिबाग- राजकारणात कोणी कधी कोणाचा शत्रू नसतो म्हणतात, याचाच प्रत्यय सध्या रायगडकरांना येतो आहे. गेली पाच वर्षे तटकरे विरोधात तक्रारीचा पाढा वाचणारे, बंडखोरी करत उठाव करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि पक्ष प्रतोद भरत गोगावले हे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी जोमाने कामाला लागले आहेत. या निमित्ताने तटकरे गोगावले यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तटकरे आणि गोगावले यांच्यातील बेबनावाचा पहिला अंक रायगडकरांनी पाहिला. हा बेबनाव इतका टोकाला गेला की शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी पक्षा विरोधात उठाव केला. शिवसेनेचे पक्षांतर्गत बंड महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला कारणीभूत ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट महायुतीत सहभागी झाला. यात तटकरे कुटुंबाचाही समावेश होता. आदिती तटकरे यांची पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागल्याने, तटकरे गोगावले यांच्यातील बेबनावाचा दुसरा अंक सुरू झाला. दोन्ही नेत्यांमधील वाद मिटावे यासाठी पक्षश्रेष्टींनी प्रयत्न केले. पण कुरबुरी आणि अंतर्गत धुसफूस थांबल्याचे कधी दिसले नाही.

Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा – कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार

लोकसभा निवडणुकीतही रायगड मतदारसंघावरून जागा वाटपावरून महायुतीत तणाव होता. राष्ट्रवादी काँग्रेससह, भाजप आणि शिवसेना शिंदेगटही रायगडच्या जागेसाठी आग्रही होता. तटकरेंना असलेला सुप्त विरोध यास कारणीभूत होता. मात्र महायुतीने तटकरे यांना उमेदवारी जाहीर करताच तटकरे आणि गोगावले यांच्यातील वादाचे मळभ दूर झाल्याचे पहायला मिळत आहेत. दोघेही एकत्र येऊन नेटाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या दिलजमाईने पक्षातील कार्यकर्तेही अचंबित झाले आहेत.

हेही वाचा – LS Elections 2024: मुलगा पराभूत व्हावा ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचीच इच्छा

खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शिवेसने शिंदे गटाने पोलादपूर तालक्यात मेळाव्यांचे आयोजन केले होते. गोगावले यांनी मेळाव्याच्या नियोजनात कुठलीही कसर सोडली नाही. पक्षाचे संघटन आणि मतदारसंघावरील पकड आजही कायम असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले. एरवी तटकरेंवर टीकास्त्र सोडणारे गोगावले यावेळी तटकरेंचे तोंडभरून कौतुक करताना दिसले. आमची सर्व ताकद मतांच्या रुपाने तुमच्या पारड्यात टाकू, तुम्हाला निवडून आणण्यासाठी कुठलीही कसर सोडणार नाही अशी ग्वाही गोगावले यांनी दिली. तटकरे हे मदत करण्याची दानत असलेले नेते असल्याचे प्रशंसोद्गार गोगावले यांनी यावेळी काढले. तर गोगावले यांनी टीकाकारांना आपल्या कामाने चोख उत्तर दिले, त्यांनी मतदारसंघात प्रचंड निधी आणून जो कामांचा धडका लावला तो कौतुकास्पद असल्याचे तटकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेदांवर लोकसभा निवडणुकीने पडदा पडल्याचे या निमित्ताने दिसून आले.