महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने निर्बंधांमध्ये वाढ केली असून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे. दरम्यान लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई मॉडेल इतकं यशस्वी आहे तर मग मुंबईकरांना अजून १५ दिवसांची शिक्षा कशासाठी? अशी विचारणा त्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकंच यशस्वी असेल तर लॉकडाउन का वाढवत आहेत माहिती नाही. मुळात आकड्यांची फसवाफसवी सुरु असून आजही लोकांना ऑक्सिजन मिळत नसून, बेडसाठी पैसे द्यावे लागत आहेत. रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. सत्य परिस्थिती माहिती असल्याने सरकारची लॉकडाउन काढण्याची हिंमत होत नाही. लॉकडाउन वाढवणं म्हणजे करोनाची स्थिती गंभीर आहे याची अप्रत्यक्ष कबुली आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitesh rane on maharashtra government lockdown mumbai model sgy
First published on: 13-05-2021 at 18:19 IST