भाजपाच्या रम्याने आता आज डोस दिले आहेत ते राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना. निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसे रम्याचे डोस अधिकच खुमासदार होताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड मागे एकदा गीतेतील यदा यदा ही धर्मस्य… हा श्लोक म्हणताना चुकले होते. त्याचीच आठवण करुन देत रम्याने आव्हाड यांच्या बेसिकमध्येच लोच्या असल्याचं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी रॅली निघाली होती. यामुळे झालं असं की जितेंद्र आव्हाड यांची अर्ज भरण्याची वेळ निघून गेली. त्यावेळी त्यांच्यासोबत कन्हैय्या कुमार आणि शरद पवारही होते. यावरुनही भाजपाच्या रम्याने आव्हाड यांची खिल्ली उडवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे आजच्या व्यंगचित्रात?
रम्याला एकजण विचारतो काय रे आव्हाडसाहेब एवढा गाजावाजा करत अर्ज भरायला गेले होते. त्यांच्याबरोबर मोठे साहेब आणि कन्हैय्या कुमारही होते. त्यावर रम्या म्हणतो चिन्ह घड्याळ असं, सोबत कन्हैय्या नाव असलं की यांना वाटतं की काळ यांच्यासोबत आहे. पण शेवटी काळाच्या मनात आहे तेच होणार. पण यांच्या बेसिकमध्ये लोच्या आहे ना.. यदा यदासी धर्मस्य असं म्हणत रम्याने आव्हाड यांची खिल्ली उडवली आहे.

जुलै 2018 मध्ये प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी गीतेतला श्लोक म्हणून दाखवला. जो म्हणताना ते चुकले. त्याच्या बातम्या समोर आल्यावर ते म्हणाले तुम्ही अशा बातम्या का चालवत आहात की मी चुकलो मला श्लोक म्हणता येतो आणि ते पुन्हा श्लोक म्हणायला गेले आणि पुन्हा एकदा ते अडखळले आणि चुकले. नेमक्या याच प्रसंगाची आठवण करुन देत भाजपाच्या रम्याने जितेंद्र आव्हाड यांची खिल्ली उडवली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ramyas cartoon against jitendra awhad scj
First published on: 05-10-2019 at 14:42 IST