काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आज भाजपाच्या रम्याने डोस दिले आहेत. ‘रम्याचे डोस’ या कार्टूनमध्ये आज भाजपातर्फे अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्याच संदर्भात भाजपाच्या रम्याने अशोक चव्हाणांना टोला लगावला आहे.
काय म्हटलं आहे कार्टूनमध्ये?
अशोकराव म्हणतात, काहीजण बेडकासारखं डराव डराव करतात मात्र पाण्यासाठी कोणीही काही केलं नाही. मीच शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिलं असं एकजण रम्याला म्हणतो. त्यावर रम्या म्हणतो, हे कसं काय शक्य आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी तेच फोनवर म्हणाले होते की, पक्षात मआझं कोणीच ऐकत नाही. तर सरकारदरबारी यांचं कोण ऐकणार?
ज्यांचं पक्षात कोणी ऐकत नाही, त्यांचं सरकारदरबारी कोण ऐकणार? आणि जनता तर मुळीच ऐकणार नाही!
#रम्याचेडोस@AshokChavanINC@INCMaharashtra pic.twitter.com/aWBVhPvpHL
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 3, 2019
काय होतं त्या क्लीपमध्ये?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक कार्यकर्ता अशोक चव्हाण यांना फोन करतो. खासदारकीच्या जागावाटपावरुन तो अशोक चव्हाण यांना विनंती करतो. तुम्ही यामध्ये लक्ष घाला असं म्हणतो. त्यावर अशोक चव्हाण म्हणतात, तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मात्र मीच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे असं अशोक चव्हाण त्यांना म्हणाले होते. यासंदर्भातली ऑडिओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली होती. अशोक चव्हाण यांनीच ही क्लीप व्हायरल केली होती असंही बोललं गेलं.
मात्र अशोक चव्हाण यांच्या याच क्लीपचा संदर्भ घेऊन भाजपाच्या रम्याने अशोक चव्हाण यांची खिल्ली उडवली आहे. तसंच यांचं पक्षात कोणी ऐकत नाही आणि जनता तर मुळीच ऐकत नाही असाही टोला भाजपाने लगावला आहे.