लोकसभेत राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारासह दोन माजी आमदार व गेवराईतील स्वाभिमानच्या काही सदस्यांनी भाजपचे काम केले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ गडबडले आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारसभेत जाहीर केल्याप्रमाणे जि.प.मध्ये येत्या काही दिवसांत सत्तांतर घडवून राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रतिष्ठा पणाला लावूनही मुंडे मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. मुंडेंना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने दोन मंत्र्यांसह पाच आमदार, विधान परिषदेचे तीन सदस्य व डझनभर माजी आमदारांची फौज तनात केली होती. मात्र, मुंडेंनी सुरुवातीलाच माजी आमदार साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे व राधाकृष्ण होके पाटील यांच्यासह विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांना सोबत घेऊन यशस्वी खेळी केली. गेवराई मतदारसंघातील स्वाभिमानीचे काही सदस्यही भाजपच्या गळाला लागले. या पाश्र्वभूमीवर आता जि.प.त सत्तांतर अटळ झाले आहे. ५९ सदस्य संख्येच्या सभागृहात राष्ट्रवादी आघाडीचे ३६, तर भाजप, शिवसेना, रासपा युतीचे २३ सदस्य आहेत. सत्तांतरासाठी भाजपला ३० सदस्यसंख्या जुळवावी लागणार आहे. यात मेटे व तीन माजी आमदारांचे प्रत्येकी एक सदस्य, तर गेवराईतील स्वाभिमानीचे दोन असे २९ संख्याबळ झाल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादीतील ४ सदस्यांचा गट व अपक्ष असे ५ सदस्य राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपकडे संख्याबळ वाढल्यामुळे सत्तांतरात कोणतीच अडचण नाही, असा दावा केला जात आहे. येत्या सप्टेंबरमध्ये आताच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडताना खासदार मुंडे पुन्हा जादूची कांडी फिरवून सत्तांतर घडवतील, असे चित्र आहे. प्रचारात मुंडेंनी जि.प.त सत्तांतर घडविणार असल्याचा दावा केला होता. या पाश्र्वभूमीवर भाजपची मोच्रेबांधणी सुरू झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2014 रोजी प्रकाशित
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्यास भाजप सरसावला
लोकसभेत राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारासह दोन माजी आमदार व गेवराईतील स्वाभिमानच्या काही सदस्यांनी भाजपचे काम केले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ गडबडले आहे.
First published on: 23-05-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ready for zp power collecting