शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम सुरु केली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याची माहिती आहे. ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कितीही दबाव टाकलात तरी एक लक्षात ठेवा…- छगन भुजबळ

“प्रताप सरनाईक हे शिवसनेचे जबाबदार आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याबाबत अशा पद्धतीने सुडाचं राजकारण केलं जातंय ही बाब निंदनीय आहे. ‘ईडी’ने धाड टाकली किंवा काहीही झालं तरीही महाविकास आघाडीचं सरकार पुढील २५ वर्ष टिकणार आहे. आमचं सरकार, आमचे आमदार आणि आमचे नेते अशा प्रकारच्या धाडींमुळे कोणालाही शरण जाणार नाहीत. त्यामुळे अशा धाडी टाकून सरकार बनवता येईल असं ज्यांना वाटतंय, ते मूर्ख आहेत”, अशी टीका राऊत यांनी भाजपावर केली.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

“आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखं काम करु नये. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे ते स्वप्न विसरुन जा”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp vs shivsena pratap sarnaik ed raid sanjay raut slam devendra fadnavis chandrakant patil led party see reaction vjb
First published on: 24-11-2020 at 12:30 IST