देशात कॉंग्रेसविरोधी लाट असून, चार राज्यातील निवडणुक निकालांनी हे सत्य अधोरेखित केले आहे. राज्यातील जनताही सरकारच्या कारभाराला कंटाळली असून महाराष्ट्रातही परिवर्तन अटळ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. चार राज्यांतील विधानसभांचे निकाल हा कॉंग्रेस सरकारच्या कारभाराविरोधातील कौल असून २०१४ साली राज्यातही परिवर्तन झालेले दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशात असलेली नरेंद्र मोदींची लाट आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात केलेल्या विकासकामांमुळेच आजचे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपची ही घौडदौड पहायला मिळेल, असंही फडणवीस पुढे म्हणाले. नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून आजच्या निकालांवरही त्याचा मोठा परिणाम होणार असे दिसते. विशेषत: भाजपला मिळालेला विजय पाहता, या अधिवेशनात ते अधिक आक्रमक झालेले दिसतील.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2013 रोजी प्रकाशित
महाराष्ट्रातही परिवर्तन अटळ – देवेंद्र फडणवीस
राज्यातील जनताही सरकारच्या कारभाराला कंटाळली असून महाराष्ट्रातही परिवर्तन अटळ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

First published on: 08-12-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will come into the power in 2014 in maharashtra devendra phadanvis