हळदीचा मंडप उभारताना चहासाठी आवाज देऊनही मुलगी आली नाही; आत जाऊन पाहिलं तर…

पोलिसांकडून तपास सुरु

प्रातिनिधिक

लग्नाची जय्यत तयारी सुरु असताना आणि हळदीचा मांडव उभारण्यासाठी काही क्षण शिल्लक असतानाच २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने हळद लागण्यापूर्वीच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेडमधील उमरी शहरातील व्यंकटेशनगर परिसरात १० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.

शहरातील व्यंकटेशनगर भागातील किरकोळ किराणा व्यावसायिक संजय गणेशराव काचवार यांची एकुलती एक कन्या दुर्गा काचवार हिचा विवाह नांदेड येथील तरुणाशी १४ फेब्रुवारी रोजी निश्चित झाला होता. अवघ्या चार दिवसांवर विवाह असल्याने दोन्हीकडील मंडळींची लगीनघाई सुरू होती. दरम्यान बुधवारी दिवसभर दुर्गा व तिच्या परिवारातील सदस्यांनी शहरात लग्नाच्या साहित्याची खरेदी केली. गुरुवारी अमावस्या असल्याने एक दिवस आधी हळदीचा मंडप टाकायचा निर्णय घेवून मंडपासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली. त्यानंतर परत राहिलेली खरेदी करण्यासाठी परिवारातील अन्य सदस्य घराबाहेर पडले. यावेळी दुर्गा व तिचे वडिलच फक्त घरी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bride commit suicide in nanded sgy

ताज्या बातम्या