बुलढाणा अर्बन बँकेतील चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पाचोड पोलिसांना आठ दिवसांनी यश आले आहे. बँकेतील शिपाईच या चोरीच्या घटनेमागील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कृष्णा एरंडे असे या शिपायाचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


बुलढाणा अर्बन बँकेत ६ एप्रिलला चोरी झाली होती. बँकेचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी बँकेत आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. पाचोड पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर या घटनेमागे बँकेचा शिपाईच असल्याचे उघड झाले. कृष्णा एरंडे असे त्याचे नाव असून, तोच या घटनेमागील मुख्य सूत्रधार आहे. आठ दिवसांनी या घटनेचा छडा लावण्यात पाचोड पोलिसांना यश आले आहे. ६ एप्रिल रोजी कामे आटोपून कर्मचारी बँक बंद करून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी बँकेत आले. बँकेत चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. बँकेत पाहणी केली असता, एकही टाळे फोडलेले आढळून आले नाही. त्यामुळे बँकेतीलच व्यक्तीचा या चोरीच्या घटनेत सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला. अखेर आठ दिवसांनी या घटनेमागील सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचले. तिजोरी आणि बँकेच्या शटरच्या चाव्या शिपाई कृष्णाकडे होत्या. त्यानेच तिजोरीवर डल्ला मारला. चोरलेले पैसे पाण्याच्या लहान पिंपात टाकून आंबड-पाचोड रस्त्यालगतच्या एका शेतात पुरून ठेवला होता. कृष्णाने गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldana urban bank robbery mastermind bank peon arrest pachod police
First published on: 15-04-2017 at 16:50 IST