“सांगलीत दंगल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांची बाजू घेतली होती,” असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी केला होता. या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आपण कुणालाही पाठिशी घातलं नाही. अजून मंत्रिपदाचं वाटप झालेले नाही. त्यामुळे पाठिशी घालण्याचा प्रश्नच नाही,” असं पाटील म्हणाले

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील यानी सर्वच विषयांवर भाष्य केलं. “सांगलीत दंगल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांची बाजू घेतली होती,” असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी केला होता. या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आपण कुणालाही पाठिशी घातलं नाही. अजून खातेवाटपाबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय असा प्रश्नच उद्भवत नाही. गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत,” असं पाटील म्हणाले. त्याचबरोबर “भिमा कोरेगाव प्रकरणावर आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहे. कोणत्या गुन्ह्यांमध्ये  जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील,” असं पाटील म्हणाले.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही अशी आमची वृत्ती नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेवू. आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही, पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतले जातील. महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली. याबाबत माहिती घेऊ,” असं पाटील म्हणाले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू. आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही. ज्याला आवश्यक असेल त्याला आढावा घेऊन मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य राहिल,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.