सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज परिसरात पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी साठलेल्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यातून दुभाजकावर आदळून मोटार उलटी झाली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. भुईंज परिसरात दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर सायंकाळी ही घटना घडली. मागील दहा दिवसांपूर्वी झालेल्या वळीवाच्या पावसाने महामार्गाला मोठे खड्डे पडले आहेत. याच मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागले.

महामार्गावर भुईंज येथे साताराहून पुण्याच्या दिशेने येणारी मोटार भरधाव वेगात होती. पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने मोटार पलटी होऊन दुभाजकावर आदळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या दरम्यान भुईंज येथील तरुण व्यापारी सूरज लोखंडे व त्यांच्या मित्र परिवाराने मदतकार्य दिले व घटनास्थळी भुईंज पोलीस व महामार्ग पोलीस यांनी मदत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय महामार्गाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हावासीयांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. महामार्गावर शिंदेवाडीपासून मालखेडपर्यंत कराडमधील ठिकठिकाणी अडथळ्यांची शर्यत पार करूनच प्रवास करावा लागत आहे. साताऱ्याच्या पुढे बोरगाव ते अतीत व त्यानंतर कराड या भागात सहा पदरीकरणाची कामे सुरू आहेत. आनेवाडी ते खंडाळ्यापर्यंत महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. साईडपट्ट्या खचल्या आहेत. सेवा रस्ते खड्ड्यात गेले आहेत. याच खड्ड्यात पाणी साचून अपघात होत आहेत. हीच परिस्थिती मुख्य महामार्गावरही आहे. मे महिना उलटला असून, पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात महामार्गावरील परिसरात खड्ड्यात गाडी आदळून उलटी झाली. चालकाला खड्ड्याचा अंदाज न झाल्याने गाडी उलटी होऊन दुभाजकावर आदळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.