शिंदे-फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नसल्याने प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू नाराज आहेत. त्यातच मंत्रीपदाचा दावा सोडणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याने १८ जुलैनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी भाष्य केलं आहे.

बच्चू कडू यांनी काय म्हटलं?

“मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होता. पण, मुख्यमंत्री सतत फोन करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी भेटीनंतर निर्णय घेण्याबाबत विनंती केली आहे. त्यामुळे १७ तारखेला मी मुख्यमंत्री भेटणार असून, १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करणार आहे,” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंशी युती करणार का? राज ठाकरे क्षणभर थांबले, मिश्किल हसले अन्……

याबद्दल ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “बच्चू कडू स्वाभिमानी आहेत. बच्चू कडूंना बाजूला करण्यात आलं. फक्त बच्चू कडूंचा वापर करण्यात आला. त्याचा राग बच्चू कडूंना आला आहे. त्याच रागातून मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं बच्चू कडूंनी जाहीर केलं आहे.”

हेही वाचा : “अजित पवारांच्या माणसांकडून पाठलाग, पत्नीला…”, गट बदलल्यानंतर राष्ट्रवादीच्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे. जनतेचे प्रश्न खोळंबले आहेत. पाडापाडीचं आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल,” असेही चंद्रकात खैरे यांनी म्हटलं.