दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या नातवावरील वक्तव्यावरून नरेश म्हस्केंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “तेव्हा श्रीकांत शिंदेंच्या आई आणि पत्नी…”

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“मी दोन-अडीच वर्षांपासून आपले सरकार येईल, असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले”, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला मोठं धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – सुषमा अंधारेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना…”

“गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने आपण घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आपण जे प्रकल्प सुरू केले, ते रद्द करण्याचे का त्यांच्या सरकाने केले”, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच “मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवले, तेव्हा अनेकांनी मला नावं ठेवली होती. मात्र, तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत याचा पूर्णपणे विचार करण्यात आला होता”, असेही ते म्हणाले.