देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, स्कॉर्पिओ-ट्रकच्या धडकेत चिमुकल्यासह सहा ठार

दीड वर्षाच्या चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू

(सांकेतिक छायाचित्र)
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रात्री भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्यासह
सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सातजण जखमी असल्याचं समजतंय. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात व मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रपूर-मूल मार्गावर केसलाघाट येथे बंद असलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतक गोंदिया येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनाहून येताना हा अपघात झाला झाला, मृतक चंद्रपुरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अपघातामध्ये संभाजी भोयर, कुसुम भोयर, जियन भोयर, दत्तू झोडे, मीनाक्षी झोडे, शशिकला वाढरे यांचा मृत्यू झाला. तर, जितेंद्र पटपल्लीवार, मीनाक्षी भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीतल पाटील, रेखा खटिकर हे जखमी आहेत. जखमींवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात व मूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrapur major accident scorpio and truck six died sas

Next Story
जीव धोक्यात घालून तिरंगा वाचवणाऱ्या शिपायाचा मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी