सुहास सरदेशमुख

बीड जिल्ह्यातील शिरुरकासारमधील सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांच्या सर्पराज्ञी प्रकल्पात आता वन्यजीवांची जोपासना करण्याबरोबरच सत्तरहून अधिक दुर्मीळ वनस्पतींची रोपवाटिका तयार केली जात आहे. दुर्मीळ वनस्पतींची एक लाख रोपांची रोपवाटिका विकसित व्हावी असे प्रयत्न सुरू झाले असून करोनाकाळातही एक लाख रोपे तयार करुन त्यांनी विविध संस्थांना व निसर्गप्रेमींना दिली आहेत. या प्रकल्पातून अलीकडेच एक जखमी गिधाडावर उपचार करुन त्याला पुन्हा वनात सोडण्यात आले. आजही या प्रकल्पात काळवीट, घुबड, वानर, खोकड, हरणांचे पाडस , पोपटाचे पिल्लू यांच्यावर उपचार सुरू आहेत. वन्यजीव व वनराई विकसित करण्याच्या प्रयत्नांसाठी आता दुर्मीळ बियाणांच्या जाती सोनवणे कुटुंबीय एकत्रित करत आहेत.

Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
seahorses sindhudurg loksatta news
समुद्री घोड्यांच्या संवर्धन, प्रजनन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गची निवड
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार
Mission Bhagirath Prayas
नाशिक : मिशन भगीरथ प्रयासमुळे भूजल पातळीत वाढ, काठीपाडा परिसरास लाभ
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
blossoms of Cosmos flowers in Autumn season
निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…

वन्यजीवांसाठी काम करण्याचे ध्येय उराशी बाळगून सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांनी गळयात जिवंत सापाचा हारासारखा उपयोग करत विवाह केला. शिरुरकासार पासून १५ किलोमीटरवर डोंगरमाथ्यावरील १७ एकर स्वमालकीच्या जमिनीपैकी अडीच एकर जमीन स्वत:साठी ठेवत बाकी जमीन वन्यजीवांसाठी राखीव ठेवण्यात आली. डोंगराळ भागातील अनेक वन्य जीव या प्रकल्पात आता आवर्जून हजेरी लावतात. गरुडासारख्या पक्ष्याला लहान मुलांप्रमाणे हाताने भरविणाऱ्या आणि मोराच्या डोळ्यात औषधे टाकणाऱ्या सृष्टी सोनवणे व सिद्धार्थ यांनी अनेक प्राण्यांवर उपचार केले. ही संख्या काही हजारात असेल. अलिकडेच उपाशीपोटी असणारे एक गिधाड बीड जिल्ह्यातील डोंगरदऱ्यात मलूल होऊन पडले होते. आकाराने मोठा पक्षी काही तरी करेल म्हणून गुराख्यांनी त्याला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. त्यात ते जखमी झाल्याने त्याला सर्पराज्ञी प्रकल्पावर आणले होते. त्यावर उपचार केल्यानंतर प्रजासत्ताक दिनी त्याला पुन्हा वनक्षेत्रात सोडण्यात आले. अनेक वन्य पशुपक्ष्यांना जीवदान दिल्यानंतर आता दुर्मीळ वनस्पती जतनाचा नवा कार्यक्रम या जोडप्याने हाती घेतला आहे.

करोनाकाळात औरंगाबाद, बीड, लातूर, नगर, उस्मानाबाद जिल्ह्यातून दुर्मीळ वनस्पतींच्या बियाणे गोळा करण्यात सिद्धार्थ, सृष्टी सोनवणे व त्यांची मुलगी सर्पराज्ञी यांनी पुढाकार घेतला. यामध्ये वार्यवर्ण, पांढरा पळस, पिवळा पळस, कोशिंब, बिबवा, चारोळी, काटेसावर, कौशी, सालई, गोरखचिंच, तांबडा कुडा, डिकामल, मास रोहिणी, देवबाभुळ, लाल हादगा, पांढरा कांचन, मोखा, पाडळ, बिजा, काळी निर्गुडी, पांढरी गुंज अशा बियाणे गोळा करण्यात आली आहेत. त्यापासून रोपवाटिकाही तयार करण्यात आली आहे. या प्रयोगाच्या अनुषंगाने बोलताना सिद्धार्थ सोनवणे म्हणाले, ‘२००१ पासून वन्यजीव वाचावेत म्हणून आम्ही कुटुंबीय प्रयत्न करत आहोत. पण केवळ एवढे करुन भागणार नाही तर वन आणि त्यातील दुर्मीळ वनस्पतीही जतन करायला हवी, असे वाटू लागले. त्याप्रमाणे करोनाकाळात काम सुरू केले. गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या झाडांची रोपे केली होती. या वर्षी फक्त दुर्मीळ वनस्पतींची रोपवाटिका तयार केली आहे. प्रत्येक वनस्पतीचे स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत. त्यावर अनेक वन्यजीव जगतात. त्यामुळे हे काम आता हाती घेतले आहे.’ वन व पशुसंवर्धन विभागातील अधिकारीही आता या प्रकल्पास सहकार्य करू लागले आहेत.

शिरुरकासारपासून जवळच असणारा या प्रकल्पासाठी लागणारा पैसा सिद्धार्थ स्वत: शेतीच्या उत्पन्नातून मिळवतात. अलीकडे या प्रकल्पाला अनेकजण आर्थिक मदत करत असले तरी एखादा आजारी वन्यजीव आडवळणी गावात सांभाळणे अवघड काम. आजारी व अपघातग्रस्त प्राणी वन् अधिकारी आणून सोडतात तर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी औषधांचा खर्च करतात. आता नवे काम हाती घेतले असल्याने वन आणि वन्यजीव असा कामाचा विस्तार होऊ लागला आहे.

Story img Loader