केमिकल वाहतूक करणारा टँकर मुंबईहून कणकवलीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणा-या टाटा पंच कारला धडक देत उलटला. मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर वायू गळती झाल्याने दुर्गंधी पसरली तर काही वेळासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील वहातूक विस्कळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वकील गुलाम अहमद (वय २२) राहणार धदारपुर, वाराणसी, राज्य उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील टँकर (एम एच ४३ वाय ३४१७) एलडीओ केमिकल घेवून मुंबई कडून कणकवलीकडे जात होता. हा टँकर लांजा आंजनारी पूल येथे आला असता उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरने यावेळी लांजाहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या टाटा पंच कारला (एम एच ४७ बिटि ०१२४) धडक देत उलटला. ही कार नीलेश प्रकाश विलनणकर (वय ४७), राहणार खडपे वठार, रत्नागिरी हे चालवत होते.
या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात टँकर मधील केमिकल सांडल्याने दुर्गंधी पसरल्याने काही वेळासाठी वहातुकीचा खोळंबा झाला. मात्र लांजा पोलिसांनी घटनास्थळी जावून क्रेनच्या मदतीने टँकर बाजुला करुन वहातुक सुरळीत केली. तसेच अपघातातील जखमी टँकर चालकाला पाली ग्रामिण रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले आहे.