ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपण १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत, भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. मी एवढंच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनीदेखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. या सगळ्या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?

“छगन भुजबळांनी जर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तर सरकारी गाडी, बंगला असं सगळं कसं काय वापरतात? कॅबिनेटच्या बैठकांना कसे जातात? कॅबिनेटला जात नसतील तर चला मान्य करु. अहो पण भुजबळ राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो. तुम्ही इतके वरिष्ठ नेते असून तुम्हाला हे माहीत नाही? लोकांना मूर्ख समजू नका. गरीब ओबीसी बांधवांचा विश्वास आहे आणि भुजबळ त्यांच्याशी धडधडीत खोटं बोलत आहेत की मी राजीनामा दिला. १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला असता तर ते कॅबिनेटमध्ये नसते. मुख्यमंत्र्यांना राजीनामा देणं म्हणजे राजीनामा नाही. आम्हीही ओरडून सांगायचो आम्ही राजीनामा देतोय आणि शरद पवारांना राजीनामा देऊन यायचो. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते तो राजीनामा फाडून टाकायचे. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणं हे नाटक आहे.”

congress rebel candidate vishal patil
शिस्तभंगाची कारवाई करणाऱ्यांनी काँग्रेससाठी योगदान किती तपासावे – विशाल पाटील
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

छगन भुजबळांनी धडधडीत खोटं बोलू नये

आव्हाड पुढे म्हणाले, “छगन भुजबळ हे राजकारणातले मोठ्या उंचीचे नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारे खोटं बोलणं अपेक्षित नाही. राज्यात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात जशी भांडणं लावण्यात आली तशीच आता ओबीसी आणि मराठे यांच्यात भांडणं लावण्यात येत आहेत. हजारो वर्षे हे बहुजन लोक एकत्र राहिले आहेत. कुंभार, माळी, तेली सगळेच एकत्र राहात होते. पण त्यांच्यात तुम्ही भिंत उभी केलीत. जसे मुस्लीम घाबरुन राहातात तसेच आता मराठे किंवा ओबीसी जे कमी असतील ते घाबरत आहेत. गाव सोडून जाण्याची भाषा करत आहेत. जे काही झालं ते चांगलं झालं नाही. छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नये. राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो आणि पत्रकार परिषद घेऊन सांगायचं असतं की मी या कारणासाठी राजीनामा दिला. असे फसवाफसवीचे प्रकार करु नका, यामुळे राजकारण्यांची विश्वासार्हता संपते. आता खोटं कशाला बोलता?” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- राजीनामा देऊनच ‘ओबीसीं’साठी मैदानात; छगन भुजबळ यांचा नगरमध्ये गौप्यस्फोट

छगन भुजबळ काय म्हणाले?

ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, “सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नाहीत तर मग राजीनामा द्या. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे काय राहता? हिंमत असेल तर राजीनामा द्या. काल कोणीतरी बोललं या भुजबळला लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला बाहेर हाकला. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी आधीच राजीनामा दिला आहे.”