छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया सुरूच असून नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात पाच जवान जखमी झाले आहे. या स्फोटात एक ग्रामस्थही जखमी झाला असून या स्फोटानंतर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडमधील बीजापूर घाटी या परिसरात नक्षलवाद्यांनी बुधवारी सकाळी अत्याधुनिक स्फोटकांच्या मदतीने (आईडी) स्फोट घडवला. या स्फोटात पाच जवान जखमी झाले असून एक ग्रामस्थही यात जखमी झाला. सीमा सुरक्षा दलाच्या तीन जवानांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना बीजापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटानंतर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh 5 jawans injured in ied blast by naxals in bijapur ghatti
First published on: 14-11-2018 at 10:46 IST