वाई:प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील कार्यक्रमात केली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा कर्यक्रमात् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.रायगडावर ५० कोटी रुपये निधी देणार असल्याचे सांगितले.तसेच प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात अल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील कार्यक्रमात केली.

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक मोठा वारसा आहे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात किल्ले अजिंक्यतारा सह एकूण २५ पेक्षा अधिक गड किल्ले आहेत. या गडांना झळाळी देणे, ऐतिहासिक ठेव्यांचे संरक्षण करणे. त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे अशा मोठ्या जबाबदाऱ्या प्राधिकरणाच्या निमित्ताने पार पाडल्या जातील .उदयनराजेंकडे मोठी जबाबदारी येणार असे संकेत यापूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार केंद्राच्या निर्देशाप्रमाणे उदयनराजेंना प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या इतिहासाला झळाळी देण्याची एक नवी संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे..यामुळे उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस जलाभिषेक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार उदयनराजे भोसले आदी ( छाया: प्रमोद इंगळे ,सातारा))