लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर: आषाढी यात्रेपुर्वी पंढरपूर येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली. शहरातील दर्शरांग, वाळवंट, वाखरी पालखीतळ आदी ठिकाणी जाऊन प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधेची माहिती घेतली व योग्य त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी यात्रेपूर्वी पाहणी केल्याची बहुधा पहिलीच घटना आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यस्त दौऱ्यातून पंढरपूरला भेट देण्याचे अचानक ठरवले. ते नांदेडहून सोलापूर येथे आले. तेथून ते पंढरपूर येथे आले. सर्व प्रथम त्यांनी दर्शन रांगेची पाहणी केली. रांगेतील भाविकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा-खुडूस येथील माउलींचे रिंगण, तर माळीनगर येथे तुकोबारायांचे उभे रिंगण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर, वाखरी पालखीतळ, आरोग्य शिबीराची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी पाहणी करताना प्रशासनाला सूचना देत भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचे सांगितले. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री येऊ देत विठ्ठल दर्शनाला येणाऱ्यांचे स्वागत आहे असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीशी बोलताना म्हणाले. यंदाच्या वारीसाठी मुख्यमंत्री यांनी अनुदान दुप्पट केले. तर यात्रेपूर्वी पाहणी करणारे आणि भाविकांनी संवाद साधून अडचणी जाणणारे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.