सोलापूर : बेरोजगारी, आरक्षण आणि खासगीकरणाच्या मुद्यावर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाच महिन्यांपूर्वी पोलिसांच्या समक्ष काळा झेंडा दाखवून त्यांच्या अंगावर शाईफेक केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोत्यात आलेल्या भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांना अखेर सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर व शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

अजय मैंदर्गीकर हे भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून आक्रमक पद्धतीने आंदोलने करतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गेल्या १५ ऑक्टोबर रोजी सोलापुरात शासकीय विश्रामगृहात आले असता पोलीस सुरक्षा व्यवस्था भेदून अजय मैंदर्गीकर (वय २६) यांनी पालकंमंत्र्यांसमोर अचानकपणे काळा झेंडा दाखवून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगावर शाईफेक केली होती. यापूर्वीही मैंदर्गीकर यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना एका सामूहिक विवाह सोहळ्यात गाठून त्यांच्याही अंगावर शाई फेकली होती.

हेही वाचा – “मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

हेही वाचा – फडणवीस यांनी घेतली गडकरी यांची नागपुरात भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी नोकरावर हल्ला करणे, इतरांच्या जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका निर्माण करणे, दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करणे असे आरोप मैंदर्गीकर यांच्यावर आहेत. जोडभावी पेठ पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविला असता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी त्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तडीपारीची कारवाई करण्यात आली.