बंडखोरी करणाऱ्यांना महायुतीत स्थान नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महायुतीची पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीची घोषणा केली. त्याचवेळी बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर यावेळी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला आहे. भाजपा 150, शिवसेना 124 तर मित्रपक्ष 14 जागांवर लढणार असा हा फॉर्म्युला आहे. यावेळी बंडखोरी करणाऱ्यांना महायुतीत स्थान नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं आहे.

यावेळी ज्यांना तिकिटं देण्यात आली नाहीत त्यांच्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. तिकिटं कापली असं कोणाबद्दलही म्हणू नका कारण आम्ही जबाबदारी बदलली असं मी याबद्दल म्हणेन असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरे हे वरळीतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तिकीटं कापली म्हणणं योग्य नाही, जबाबदारी बदलली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. मुंबईतून आदित्य ठाकरे सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढच्या दोन दिवसात बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु पण तरीही कोणी बंडखोरीवर ठाम असेल तर महायुती पूर्ण ताकदीने त्यांच्याविरोधात लढेल असे फडणवीस म्हणाले.