मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी ( ११ जानेवारी ) अडीच तास खलबतं झाली. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पण, इंदू मिलसंदर्भात ही भेट होती. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते, अन्यथा नाही. आमचा शिवसेनेबरोबर ( ठाकरे गट ) जाण्याचा विचार आहे, असं आंबेडकर यांनी आज ( १२ जानेवारी ) पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गुलाबराव पाटील सिंदखेडराजा येथे आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदेंनी कोणाला सोडाव आणि पकडावं हे प्रकाश आंबेडकरांनी सांगण्याची गरज नाही. जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.”

हेही वाचा : “राहुल गांधींची दाढी काढा अन्…”, RSSचा उल्लेख करत नितेश राणेंचं टीकास्त्र

“एकनाथ शिंदेंचा अधिकार खूप मोठा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विकास आराखड्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहे. सरकार त्याबद्दल कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिंदखेडमध्ये विकास होणार आहे,” असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार? संभाजी पाटील निलंगेकरांचं मोठं विधान; म्हणाले…

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“सध्या सगळीकडेच संभ्रमाची स्थिती आहे. आमचा शिवसेनेबरोबर ( ठाकरे गट ) जाण्याचा विचार आहे. आपण या चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर सांगू, असा आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता. आता युती कधी जाहीर करायची हे शिवसेनेने ठरवायचं आहे. ही युती जोपर्यंत जाहीर होणार नाही, तोपर्यंत अनेक तर्क लावले जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर भेट होणारच आहे. पण, प्रत्येक भेट ही राजकीय आहे, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते. अन्यथा नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde big decision in world gulabrao patil taunt prakash ambedkar ssa
First published on: 12-01-2023 at 19:47 IST