राज्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे दावे-प्रतिदाव्यांच्या राजकारणात दोन्ही बाजू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी संध्याकाळी बोलताना प्रियांका चतुर्वेदी व आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावर चतुर्वेदींनी केलेल्या टीकेला आता संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे व प्रियांका चतुर्वेदींचा उल्लेख केला होता. “ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत भयानक वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना त्यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची खासदारकी दिली”, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”

दरम्यान, शिरसाट यांच्या या विधानावर प्रियांका चतुर्वेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “माझी एखाद्या चरित्रहीन व्यक्तीच्या बाबतीत कोणतंही उत्तर द्यायची इच्छा नाही. मला जे बोलायचं होतं, ते मी ट्विटरवर सांगितलंय. त्यानंतर मला अशा चरित्रहीन व्यक्तीबद्दल बोलाययची गरज नाही. त्यांची सवय आहे कुणाबद्दलही बोलायची. जे स्वत: चरित्रहीन असतात, ते दुसऱ्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात”, असं त्या टीव्ही ९ शी बोलताना म्हणाल्या.

संजय शिरसाटांनी दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, प्रियांका चतुर्वेदींच्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट यांनी ते त्यांचं विधान नसल्याचं म्हटलं आहे. “चारित्र्यहीनतेच्या गप्पा प्रियांका चतुर्वेदींनी मारू नयेत. हात जोडून विनंती आहे. आम्ही चारित्र्य काढायला बसलो, तर बात लंबी चलेगी. मी त्यांच्यावर आरोप केलेला नाही. तो आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून…”; ‘त्या’ नेत्याचा उल्लेख करत शिंदे गटाचा दावा, म्हणाले…

“जेव्हा चंद्रकांत खैरे लोकसभेला पडले तेव्हा त्यांचं पुनर्वसन करायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आम्ही स्वत: चंद्रकांत खैरेंना घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. यांच्यासाठी काहीतरी करा असं आम्ही म्हणालो होतो. तेव्हा नक्कीच यांचं पुनर्वसन करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. जेव्हा लोकसभेच्या आणि विधानपरिषदेच्या जागा निघाल्या, तेव्हा आम्ही स्वत: खैरेंचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की आता खासदारकीला तुम्ही उमेदवार आहात. तसाच सिग्नलही त्यांना देण्यात आला होता. पण ऐनवेळी आदित्य ठाकरेंनी काय कांडी फिरवली माहिती नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“त्यामुळे हे वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केलं आहे. तुम्ही माझ्या तोंडी हे का मारता मला कळत नाही”, असंही शिरसाट यावेळी म्हणाले.