राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात आज ( ४ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जात भेट घेतली. तसेच, प्रकृतीबाबात विचारपूस केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला.

“शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. शरद पवार यांनी माझ्याशी संवाद साधला. उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन त्यांच्या काही टेस्ट करतील. परत त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात”

“दिवाळीत किमान ५० हजार लोकांना शरद पवार भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं, न्यूमोनिया किरकोळ विषय आहे,” अशी महिती माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ( ३ नोव्हेंबर ) शरद पवारांच्या भेटीनंतर दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“न्यूमोनिया बद्दल रोजच्या रोज तपासणी केली जाते. त्यानुसार डॉक्टर सल्ला देत राहतात. शरद पवार यांना आराम करण्याची गरज आहे. परंतु, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला ते उपस्थित राहतील. त्यानंतर थोडा आराम करतील. परत आपल्या नियमीत कामाला लागतील, अशी आशा आहे. मला शरद पवारांनी कारखाना सुरु केला का? मोळी टाकली का?,” असेही विचारल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.