काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. सावरकर गौरव यात्रा आज ठाण्यात पोहोचली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या यात्रेत सहभागी झाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बातचितही केली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या गौरव यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचं मी स्वागत करतो. वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांचा त्यांच्याविरोधात बोललं जात आहे. या लोकाना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे.

हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सावरकरांचा अपमान सहन करणार नाही”

एकनाथ शिंदे म्हणाले की, वीर सावरकरांचा अपमान देशात कोणीही सहन करणार नाही, असा संदेश या यात्रेद्वारे देत आहोत. त्याची छोटीशी झलक आज या ठाण्यातील गौरव यात्रेतून तुम्हाला दिसेल. सावरकरांबद्दल एकही शब्द कोणी ऐकणार नाही, सहन करणार नाही, म्हणून ही गौरव यात्रा काढण्यात आली आहे. तसेच सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणाऱ्यांचं मी या यात्रेत स्वागत करतो.