राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसंच मुंबईमध्येही पावसाच्या धारा कोसळत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक डोंबिवलीपर्यंतच करण्यात येते आहे. सीएसटी स्टेशनवर लोकांची गर्दी झाली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाऊस परिस्थितीवर आमचं लक्ष

मी सकाळपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे आपात्कालीन यंत्रणा, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या सगळ्यांना अलर्ट करण्यात आलं आहे. आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal is the main mastermind of the Excise policy scam
केजरीवाल हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
eknath shinde raj thackeray (2)
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

हे पण वाचा- डोंबिवली-कल्याण जलमय

SDRF आणि NDRF अलर्टवर

सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमची यंत्रणा अलर्टवर आहे. NDRF ला हे माहित आहे की पूर परिस्थिती कुठे आहे? तसंच आपात्कालीन परिस्थिती जिथे निर्माण झाली आहे तिथेही त्यांच्या तुकड्या तैनात आहेत. जिल्हा प्रशासनही सज्ज आहे, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जे लोक अडकले आहेत त्यांना सोडवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनाही आम्ही घरी पाठवलं आहे. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही पाठवण्यात आलं आहे.

हे पण वाचा- पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

एका महिलेच्या हातून तिचं चार महिन्यांचं बाळ नाल्यात पडून वाहून गेलं आहे. याबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबरनाथ मध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. काही दुर्घटना आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून प्रशासन काळजी घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी देखील अशा प्रकारचा अलर्ट असतो तेव्हा आपल्याला घराबाहेर कामाशिवाय पडायचं नसेल तर पडू नये. सुरक्षित स्थळी रहावं असंही आवाहन मी सगळ्याच जनतेला करतो आहे. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिल्यावर प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.