Hingoli Rains : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली असून आसना नदीला पूर आला आहे. या पुरामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तसेच तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

हेही वाचा – सातारा-ठोसेघर रस्त्यावर सज्जनगड जवळ दरड कोसळली; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली.

हेही वाचा – मुंबईत आज दुपारपासून २४ तासांसाठी रेड अलर्ट; मनपाने ट्वीट करत दिली माहिती

रात्रभर बरसलेल्या पावसाने आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी किनारी असलेले कुरुंदा हे गाव पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पावसामुळे या पावसामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण…”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत; मंत्रीपदाबाबतही स्पष्ट केली भूमिका!