गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून शिवसेनेवर आणि मुख्यत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घराबाहेर पडत नसल्याची टीका केली जात आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा सामाजिक जीवनातला वावर वैद्यकीय सक्तीमुळे काहीसा कमी झाला होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मुख्यमंत्री घराबाहेर पडून काम करत नाहीत, मंत्रालयात जात नाहीत अशी टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्र्यांनी आपण कधीपासून मंत्रालयात जायला सुरुवात करणार, याविषयी खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरं दिली.

कधीपासून बाहेर पडणार?

यावेळी घराबाहेर पडून कधीपासून कामाला सुरुवात करणार? मंत्रालयात कधीपासून जाणार? याविषयी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी त्याला खोचक शब्दांत उत्तर दिलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

“अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी या कार्यक्रमाला आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का? असं वाटलं होतं. सलग तिसऱ्या वर्षी आलोय. न सांगता येणं हे कायम चांगलं असतं. पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हे बरं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

CM Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत युती होणार का? उद्धव ठाकरे म्हणतात…

“आता बराचसा मार्गावर आलो आहे. राजकीय नव्हे, पण शारिरीक शक्तीपात झाला होता. पूर्वपदावर येतोय. जिद्द आणि हिंमत असल्यावर काहीच अशक्य नसतं. हत्ती गेला, शेपूट राहिलंय. तेही जाईल लवकर. ते गेलं की पुन्हा मंत्रालयात सुरुवात करेन”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. “मधला करोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतंय. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार. अधिवेशनातही मी जाणार आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray mocks bjp clears when he will join mantralaya budget session pmw
First published on: 25-02-2022 at 19:53 IST