‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ..’ या चित्रपटाला साजसे वातावरण वाई विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाले. निवडणूक प्रक्रियेचे काम बाजूला ठेवून एका उमेदवाराने आणलेली पाच हजार चारशेऐंशी रुपयांची चिल्लर मोजताना दमछाक झाली. यासाठी शेवटी स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना बोलवावे लागले.
विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एक हटवादी कार्यकर्ता आपला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगत होता. तो स्वतला आप पार्टीचा कार्यकर्ता समजतो तर समाजसेवकही समजतो. याने आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी सकाळपासूनच ठाण मांडले होते. त्या दिवशी प्रमुख उमेदवारांची या कार्यालयात गर्दी होती. यावेळी रामदास कदम या उमेदवाराने पन्नास पसे , एक, दोन , पाच रुपयांची नाणी दुधाच्या कीटल्या भरून आणली होती. हे पसे मला लोकांनी निवडणुकीला अनामत रक्कम भरण्यासाठी दिले आहेत. हे किती पसे आहेत ते मला माहीत नाही. तुम्ही मोजा. असे त्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. शेवटची काही मिनिटे अगोदर त्याने आपला अर्ज दाखल केला. मी सकाळपासून आलो आहे. तुम्ही मला आत का घेतले नाही. माझे काम कधीच झाले असते, असे तो बोलू लागला. त्रास देण्याच्या उद्देशने तो आला असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही व निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्यास त्यापासून परावृत्त करता येत नाही म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी रवी खेबूडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वाईचे तहसीलदार सदाशिव पददुणे, खंडाळ्याचे तळपे, व महाबळेश्वरचे अतुल म्हेत्रे यांनी परिस्थिती संयमाने हाताळून त्याचा अर्ज दाखल करून घेतला. चिल्लर मोजायला महसूल कर्मचारी बसले होते पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले. उमेदवारीची दहा हजार पकी त्यांची पाच हजार चारशेऐंशी रुपयांची चिल्लर मोजली. उर्वरित चार हजार पाचशे वीस नोट स्वरूपात जाधव यांनी दिले. आणि हा प्रकार संपवण्यात आला. पण त्यामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा कामाला लागल्याचे रवी खेबूडकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2014 रोजी प्रकाशित
उमेदवाराने आणलेली चिल्लर मोजताना झाली दमछाक
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ..’ या चित्रपटाला साजसे वातावरण वाई विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाले.

First published on: 29-09-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coins for election deposit