वाई : पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी, खेड-शिवापूर टोलनाका परिसरातील स्थानिकांना टोलमध्ये सवलत द्यावी तसेच वेळे येथे रस्ता ओलंडण्यासाठी नवीन पूल बांधावा. महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करावेत, महामार्गाच्या कामाचा दर्जा सुधारावा यासह अन्य मागण्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केल्या.

टोलनाक्याच्या २० किमी अंतरामधील नागरिकांना टोलची सवलत मिळावी. तेथील स्थानिक रहिवाशी, व्यापाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पास दिले जातात. परंतु, ती सुविधा काही लोकांनाच मिळते. तर कित्येक जण त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे संबंधित प्रत्येक व्यक्तीला सवलतीचा लाभ मिळण्यासाठी अशी एखादी व्यवस्था निर्माण करावी जेणे करून त्याची सुविधा त्यांना घेता येईल.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
nagpur, Voters Confused, polling station, Voters Confused between polling station, new hyderabad house, old hyderabad house, voting 2024, lok sabha 2024, election 2024, nagpur news, voting news, marathi news,
नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…

खेड-शिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावर सतत कोंडी होत असल्याने महामार्गावर लांबचलांब रांगा लागत आहेत. टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी त्या ठिकाणी सुधारित यंत्रणा बसवून सुविधा निर्माण करावी म्हणजे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, आशा मागण्या खा. श्रीनिवास पाटील यांनी मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदान मागणी चर्चेवेळी बोलताना केल्या.

पाटण, कराड येथील पुलांची कामे लवकर पूर्ण करावीत. पाटण शहराजवळील केरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे काम अपूर्ण अवस्थेत असून ते काम लवकर पूर्ण व्हावे करण्यात यावे. विजापूर ते गुहागर मार्गावरील कराड शहराजवळ कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलाचे काम देखील दोनतीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ते काम अद्याप अपूर्ण असून त्या कामाला गती द्यावी.

लोकसभेत सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदान मागणी चर्चेवेळी बोलताना खा. श्रीनिवास पाटील यांनी या मागण्या केल्या. पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

आ. शशिकांत शिंदेही आक्रमक

दरम्यान आ. शशिकांत शिंदे हे देखील या टोल आणि निकृष्ट रस्त्यांच्या मुद्दय़ावर आज विधान परिषदेत आक्रमक झाले. पुणे-बंगळुरु महामार्गावरील रिलायन्स कंपनीने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे रस्ता खराब झाला आहे. तरीही टोल आकारणी घेणे सुरू असल्याची टीका त्यांनी केली. ही टोल आकारणी बंद करून प्रथम रस्ता चांगला करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने संबंधितांची बैठक घेण्याचे आदेश दिले.