सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ यांच्या वतीने २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात जातिअंत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेस भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर, भाकपचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो, माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. अजित अभ्यंकर, लोकभारतीचे कपिल पाटील, शेकापचे विवेक पाटील, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, छात्रभारतीचे अध्यक्ष प्रा. जयभीम शिंदे, धर्मनिरपेक्ष रिपाइंचे श्यामदादा गायकवाड, माकपचे नेते आ. जे. पी. गावित आदी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे आयोजन भाकप, माकप, शेकाप, भारिप बहुजन महासंघ, छात्रभारती, लाल निशाण पक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपाइं, धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्या वतीने करण्यात आले आहे. या परिषदेस सर्वानी उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conference for annihilation of caste in nashik
First published on: 27-04-2015 at 03:08 IST