लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मागील दहा वर्षांत सोलापूरकरांनी मोठा विश्वास ठेवून निवडून दिलेले भाजपचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले. आता तिसऱ्यांदा भाजपने पुन्हा उमेदवार बदलला आहे. यातूनच पूर्वीच्या दोन्ही खासदारांच्या निष्क्रियतेची पोचपावती मिळते. जर पूर्वीचे दोन्ही खासदार निष्क्रिय नसतील तर त्यांना आताच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी का फिरविले जात नाही ? त्याची भाजपला लाज वाटते का, असा थेट सवाल सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर स्थानिक विकासाच्या प्रश्नावर जोरदार हल्ला चढविला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माकपचे नेते नरसय्या आडम, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापुरात यापूर्वी लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत होऊनही माझे वडील सुशीलकुमार शिंदे हे यंदा लोकसभा निवडणुकीत माझ्या खांद्याला खांदा लावून फिरतात. तर भाजपने पूर्वीचे दोन्ही खासदार आता त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी का फिरत नाहीत ? जर पूर्वीचे दोन्ही खासदारांनी सोलपूरचा विकास केला असेल तर त्यांना प्रचारासाठी निवडणूक मैदानात उतरवून दाखवावे, असे आव्हान प्रणिती शिंदे यांनी दिले.