सांगलीतील शिंदे मळा येथे जमीन वादातून काँग्रेसचे नेते आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी शुक्रवारी सकाळी हवेत गोळीबार केला. यामुळे शहरात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत शिंदे मळ्यातील एका गॅस एजन्सीच्या भूखंडावरून महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यात आणि जाधव यांच्यात अगोदरपासून वाद आहे. शुक्रवारी घटनास्थळी दोघेही हजर होते. या भूखंडावरून वाद आणखी सुरू झाला. या वेळी पाटील यांचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वादातच जाधव यांनी जवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ माजली. याबाबत संजयनगर पोलीस चौकीत माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी धावले. पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
वादातून काँग्रेसच्या नेत्याचा सांगलीत हवेत गोळीबार
जमीन वादातून काँग्रेसचे नेते आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांचा गोळीबार
Written by अपर्णा देगावकर
Updated:

First published on: 31-10-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader fired in the air in sangli due to argument