वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्राकडे येणारी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केलं आहे. यामुळे पूरक छोटे उद्योग आणि लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरात प्रसारमाध्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे हस्तक असायला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेच्या जोमात आहेत. दिल्लीतील केंद्र सरकारच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस काम करतात. फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईतील आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले,” असा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा – “ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण…”; फॉक्सकॉन वरुन जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

“महाराष्ट्राला लुटून देण्याचा प्रयत्न”

“महाराष्ट्रातील पाणी गुजरातला दिले. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी महाराष्ट्राला लुटून देण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते करत आहेत. मुंबई गुजरातला गेली तर आश्चर्य वाटायला नको. एक लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता. दरवर्षी २६ हजार कोटींचा महसूल राज्य सरकारला मिळाला असता,” असेही नाना पटोलेंनी सांगितलं.

हेही वाचा – “मोदीजी व शाहांना खूश…”, फॉक्सकॉनवरुन अमोल मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले, “लाखो हिंदू तरुण…”

“केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करुन…”

गोव्यातील आठ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यावर नाना पटोलेंनी म्हटलं, “राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरु झाल्यापासून केंद्रातील बैचेन झालं आहे. झारखंडमध्ये काँग्रेसचे दोन आमदार पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आता जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करुन यापद्धतीने देशात राजकारण सुरु आहे,” असा निशाणा मोदी सरकारवर नाना पटोलेंनी साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nana patole criticized shinde fadnavis government over vedanta foxconn picks gujrat ssa
First published on: 14-09-2022 at 16:07 IST