लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही काळापासून पुणे शहर आणि पुण्याजवळील औद्योगिक परिसरातील झुंडशाही आणि गुंडशाही अतिशय टोकाला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक मनुष्यबळ व्यवस्थापक हे त्याचे बळी ठरत आहेत. कोणतीही नवीन कारखाना सुरु होणार असल्यास त्यासाठी खडी, वाळू, बांधकाम साहित्य, कामगार, वाहतूक आणि भंगाराचे कंत्राट, पाणी टँकर हे आपल्याकडूनच घ्यावे आणि तेही आम्ही सांगू त्याच दरात घ्यावे, असे म्हणून प्रचंड प्रमाणात दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. याबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी योग्य सूचना संबंधित विभागांना देऊ, असेही पवार यांनी सांगितले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) पिंपरी-चिंचवड चाकण चॅप्टरच्या वतीने आयोजित ‘पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक परिसरातील मनुष्यबळ व्यवस्थापकांसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावरील परिसंवादात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘औद्योगिक कंपन्यामधील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना अंमलात आणण्यात येतील. निवडणूक आचारसंहिता असल्याने कोणत्याही प्रकारची घोषणा घोषणा करू शकत नाही. मात्र, एनआयपीएमच्या शिष्टमंडळाला बोलावून या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत निश्चितच बैठक घेऊ.’

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Controversial statements of Deputy Chief Minister Ajit Pawar again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव

आणखी वाचा-राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर

पुणे हे देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचे शहर असून विशेषतः उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणून पुण्याची ओळख आहे. पुण्यात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, चांगली शाळा-महाविद्यालये आणि एकूणच सर्व पायाभूत सुविधांमुळे पुणे हे कायमच उद्योगजगताच्या गुंतवणुकीसाठी आकर्षण बिंदू ठरले आहे. देशात कोणताही नवीन उद्योग यायचा असल्यास प्रथम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पुणे शहरालाच प्राधान्य असते, असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, एनआयपीएम, मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशन यांच्या वतीने मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे लेखी निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना सुपूर्द करण्यात आले. प्रास्ताविक एनआयपीएम पिंपरी-चिंचवड चाकण चॅप्टरचे अध्यक्ष नवनाथ सूर्यवंशी यांनी केले. एनआयपीएमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश करंजकर यांनी आपल्या मनोगतात मनुष्यबळ व्यवस्थापकांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांबाबत भाष्य केले. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, भोसरी, मुळशी, हिंजवडी, हडपसर, बारामती, जेजुरी आदी औद्योगिक परिसरातील विविध कंपन्यांचे सुमारे चारशेहुन अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी या वेळी उपस्थित होते.