अजित पवारांसह ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर मंत्रीपद आणि विधानसभा-लोकसभेच्या जागांवरुन महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरू शिंदे गटासह भाजपातील अनेक नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व राजकीय घडामोडींनतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या मंत्रालयात मलईसाठी नुरा कुस्ती सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “ते दादांचं वैयक्तिक मत, माझं नाही”, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं विधान चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेची वाईट परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्राचं प्रशासन पूर्णपणे ठप्प आहे. शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती, ती मदत अद्याप मिळाली नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. महागाईवर कोणतंही नियंत्रण नाही. अशी एकंदरीत परिस्थिती असताना मलाईसाठी मंत्रालयात नुरा कुस्ती सुरू आहे. ही सगळी परिस्थिती बघता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे आणि हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.