जालना शहरातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज (शनिवार) शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे. जालना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

“तुम्ही स्वार्थासाठी पार्टी सोडून गेलेले आहेत. तुम्हाला काय मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली. ज्या ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठे झालात. तुम्ही सायकलवर फिरत होता, आज कुठं पोहचलात ते केवळ ठाकरे कुटुंबामुळे आणि आज त्यांना धोका देऊन तुम्ही केवळ नाक्यासाठी जातात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. स्वार्थासाठी कुठही जाणार का? उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर पाया पडून परत येणार का?” असं कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा – “…तर मग ‘त्या’ १०० खोक्यांचीही SIT चौकशीची मागणी करा” संजय राऊतांना प्रतापराव जाधवांचा टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “महविकास आघाडीने जालना ग्रामपंचायत निवडणुकात चांगले यश मिळाले असून ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो तिथे नक्की पुढे जाऊ, असा विश्वासही यावेळी कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते दिसेल.” असे देखील ते म्हणाले.