काँग्रेसच्या एक व्यक्ती, एक पद धोरणाचा नसीम खान यांना फटका; मुंबई काँग्रेस प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

एक व्यक्ती एक पदाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान पहिले पदाधिकारी आहेत

Congress Naseem Khan resigned after partys one person one post policy
एक व्यक्ती एक पदाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान पहिले पदाधिकारी आहेत (File Photo: Facebook)

उदयपूर नवसंकल्प शिबिर घोषणापत्रातील एक व्यक्ती एक पद या घोषणेच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सुरुवात करण्यात आली आहे .या धोरणानुसार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री नसीम खान यांना मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

नसीम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष अशी दोन पदे होती. प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नसीम खान यांच्या राजीनाम्याची घोषणा करण्यात आली. एक व्यक्ती एक पदाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान पहिले पदाधिकारी आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress naseem khan resigned after partys one person one post policy sgy

Next Story
सांगलीत विधवा महिलांसाठीच्या निर्णयाचं पुढचं पाऊल, इनामधामणी गावाचा पुनर्विवाहासोबत विधवांच्या पुनर्वसनाचा ठराव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी