निषेधासाठी लातुरातील बाह्य रुग्ण विभाग बंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर : वाहतूक पोलीस आणि डॉक्टर यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास येथील शिवाजी चौकात घडला. वाहतूक पोलिसाकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर शासकीय कामात डॉक्टरांनी अडथळा आणला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांना झालेल्या मारहाणाचा निषेध म्हणून शहरातील सर्व डॉक्टरांनी मंगळवारी दिवसभर आपले दवाखाने बंद ठेवले. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही बंदची हाक दिली होती. डॉ. आनंद दिनकर गोरे (४४), चेतन ज्ञानोबा हाके (२७) हे दोघे मोटारीने अंबाजोगाई रस्त्याच्या दिशेने जात असताना शिवाजी चौकात  त्यांच्या वाहनासमोर एक वृद्ध महिला अचानक आली. त्यामुळे डॉक्टरांनी भर चौकात वाहन थांबविले. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने भर चौकात वाहन का थांबविले? अशी विचारणा करून वाहतूक पोलिसाने वाहनाच्या काचेतून हात घालून डॉ. गोरे यांची मानगूट धरली तर त्यानंतर डॉक्टरांनी वाहतूक पोलिसाला ढकलले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy between traffic police doctors outpatient department latur closed protest ysh
First published on: 02-03-2022 at 00:09 IST