महाराष्ट्रात आज (२६ जानेवारी) ३५ हजार ७५६ नवीन करोना रुग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७६ लाख ५ हजार १८१ इतकी झालीय. यापैकी सध्या एकूण २,९८,७३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज एकही ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळला नाही. सध्या ओमायक्रॉनबाधितांची संख्या २ हजार ८५८ इतकी आहे. यापैकी १ हजार ५३४ रुग्णांना त्यांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दिवसभरात राज्यात एकूण ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण ७१ लाख ६० हजार २९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१५ टक्के एवढे झाले आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी

राज्यात आज ७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ३१६ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

आतापर्यंत राज्यात एकूण किती करोना चाचण्या?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ३८ लाख ६७ हजार ३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६ लाख ५ हजार १८१ (१०.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५ लाख ४७ हजार ६४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३ हजार २९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा : तुम्हाला करोनाचा किती त्रास होणार हे ठरवणाऱ्या महत्त्वाच्या ‘जीन’चा शोध, भारतात किती लोकांमध्ये अस्तित्वात? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपर्यंत एकूण ६ हजार ३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांपैकी ६ हजार २३६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तसेच ९२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.