राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. दरम्यान, करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे. आज २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के एवढे झाले आहे. 

आज राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार ८२० झाली आहे. तर आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. सध्या राज्यात एकूण २६ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१२,४८,८२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२०(१०.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.