मी ट्रम्प नाही, डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून त्याचा प्रोमो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे उत्तरं दिली असल्याचं दिसत आहे. याच मुलाखतीत उद्धव ठाकरे आपण डोनाल्ड ट्रम्प नसल्याचं सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यांचा कार्यकाळ, समोर उभी राहिलेली संकटं अशा अनेकांवर प्रश्न विचारलेली दिसत आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का ? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार ? तसंच मंत्रालयात कमी गेल्याचा होणार आरोप याबंधीही विचारलं आहे.

उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, करोनासोबत राहायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. शहाणं व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपण तरी झालं पाहिजे असं सांगितलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिले सहा महिने आव्हानं घेऊन आले होते. करोनाचं संकट कधी संपणार हेच आपल्याला माहिती नाही असंही सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी यावेळी अंतिम परीक्षांसंबंधी सविस्तर भूमिका मांडली असून मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच ते नेमकं काय बोलले आहेत याचा उलगडा होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus maharashtra cm uddhav thackeray says i am not donald trump interview by sanjay raut sgy
First published on: 22-07-2020 at 09:20 IST