राज्यात करोनाने थैमान घातलं असून त्याचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. एकीकडे करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत असताना होम क्वारंटाइन करण्यात आलेले काही लोक बाहेर उघडपणे फिरत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी क्वारंटाइन करण्यात आलेले लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना सरळ जेलमध्ये टाका अशी मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू पाटील यांनी डोंबिवलीत करोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर ही मागणी केली आहे. डोंबिवलीत करोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोघेही परदेश प्रवास करुन आलेले असतानाही घरात न थांबता बाहेर फिरत होते. यामुळेच राजू पाटील यांनी होम क्वारंटाइन करण्यात आलेले लोक बाहेर फिरताना दिसले तर त्यांना थेट जेलमध्ये टाकलं जाव असं म्हटंल आहे.

आणखी वाचा- ट्रक अडवल्यानंतर शेतकऱ्याने केला थेट उद्धव ठाकरेंना मेसेज अन्….

याआधी राजू पाटील यांनी राज्यातील टोलनाके अजूनही चालूच आहेत, टोलनाक्यांवर करोनाचा संसर्ग होऊ शकतो म्हणून टोलवसूली तुर्तास थांबवावी असं म्हटलं होतं. तसंच महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल आणि जर जनतेला केलेलं ‘स्वयंशिस्ती’चं आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा अशी मागणीही केली होती.

आणखी वाचा- “कोणी विचारलं तर अजित पवारचा फोन आलता सांग”… क्लिप व्हायरल

ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता त्यांच महत्त्व कळलं असेल : राज ठाकरे</strong>
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी त्यांना मी देशातील विमानसेवा बंद करण्याची विनंती केली आहे. आजपर्यंत ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता डॉक्टरांचं महत्त्व समजलं असेल. आज मंदिरं बंद आहेत, पण रूग्णालये सुरू आहेत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus mns mla raju patil on home quarantine people sgy
First published on: 28-03-2020 at 16:14 IST