अमरावती : पश्चिम विदर्भात कापसाच्या वेचणीला वेग आलेला असताना प्रति क्विंटलमागे किमान ८ हजार तर, कमाल दराने ९ हजार रुपयांचा टप्पा कापसाने ओलांडला आहे. दरम्यान, बाजारपेठेत कापसाची आवक कमी आहे. त्यामुळे कापसाला सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या उद्योगांकडून कापसाला उठाव मिळत आहे, त्यामुळे त्याचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली; पण सर्वसाधारणपणे दर स्थिर होते. बहुतांशी राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोहोचला होता. तर कमाल दराने ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. सरकीच्या दरातही काही बाजारांमध्ये गेल्या आठवडय़ात सुधारणा झाली होती. सरकारचा किमान दर आता ३ हजार ७०० रुपयांवर पोहोचला, तर कमाल दराने ४ हजारांची पातळी गाठली आहे. काही बाजारांमध्ये ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला; पण सरासरी दर यापेक्षा कमी होता. बाजारात सध्या कापसाचे दर वाढत आहेत; मात्र त्या प्रमाणात आवक वाढलेली दिसत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cotton rates up to 9 thousand rupees in west vidarbha zws
First published on: 28-11-2022 at 03:17 IST