नागपुरात आई-वडिलांनी भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी केलेल्या मारहाणीत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली होती. पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युट्यूबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवणारा सिद्धार्थ चिमणे गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन दर्गामध्ये गेला होता. तेव्हापासून आपल्या लहान मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचा संशय त्याला येत होता. आपल्या मुलीला भूतबाधा झाली असून ती घालवण्यासाठी काळी जादू करण्याचं त्याने ठरवलं होतं.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

मुलीच्या आई,वडिल आणि मावशीने मिळून काळी जादू केली आणि हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. पोलिसांना मोबाइलमधून हा व्हिडीओ मिळवला आहे. या व्हिडीओत आरोपी वडील रडणाऱ्या आपल्या मुलीला काही प्रश्न विचारत असल्याचं दिसत आहे. प्रश्न समजत नसल्याने मुलगी काहीच उत्तर देत नव्हती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

काळी जादू करत असताना तिघांनीही मुलीला अनेकदा कानाखाली मारली. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर मारहाणही केली. यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली असं पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी सकाळी दर्ग्यात नेलं. नंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करुन तिघांनी पळ काढला. रुग्णालयाच्या गेटवर असणाऱ्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने गाडीचा फोटो काढला होता. डॉक्टरांनी मुलीला घोषित करुन पोलिसांना कळवलं. गाडीच्या नंबर प्लेटवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि बेड्या ठोकल्या आहेत.