scorecardresearch

अनैतिक व्यापार प्रतिबंध गुन्ह्यात दोन महिलांसह चौघांना शिक्षा

कोल्हापूरमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम गुन्ह्यातील दोन महिलांसह चौघांना न्यायालयाने बुधवारी (६ एप्रिल) सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूरमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम गुन्ह्यातील दोन महिलांसह चौघांना न्यायालयाने बुधवारी (६ एप्रिल) सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरिता रणजीत कदम (वय ४१), मनीषा प्रकाश कट्टे ( वय ३०), विवेक शंकर दिंडे (३१) यांना १० वर्षे सक्तमजुरी व २९ हजार रुपये दंड, तर वैभव सतीश तावस्कर (२८, सोलापूर) याला २ वर्षे सक्तमजुरी व ४ हजाराचा दंड करण्यात आला आहे.

कळंबा येथील एका सदनिकामध्ये सरिता पाटील ही कुंटणखाना चालवत होती. दिंडे व तावस्कर हे गरीब मुलींच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात आणण्यासाठी आरोपी महिलेकडे घेऊन येत असत. २०१९ मध्ये पोलिसांनी त्यांच्या कुंटणखान्यावर छापा टाकून एका पीडित मुलीची सुटका केली होती. एका मुलीची विक्री केल्याचा प्रकारही त्यांच्याकडून झाल्याचे तपासात उघड झाले होते.

हेही वाचा : अवैध धंद्यांवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच, कोल्हापूरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. याकामी सरकारी वकील मंजूषा पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी काम पाहिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Court sentence jail to 4 convict in prostitution case in kolhapur pbs

ताज्या बातम्या