तालुका माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी व शासनाच्या शेतकरी कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवारी घोटी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर टोलनाक्याजवळ माकपचे जिल्हा चिटणीस कॉ. देविदास आडोळे, कॉ. चंद्रकांत लाखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन्न करण्यात आले. कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करा. कामगार हिताचे कायदे करा, ठेकेदारी पद्धत बंद करा, भूमिअधिग्रहण कायदा रद्द करा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून घोटी पोलीस ठाण्यात आणले. थोडय़ा वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
घोटीजवळ माकपचा रास्ता रोको
तालुका माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी व शासनाच्या शेतकरी कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवारी घोटी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

First published on: 27-02-2015 at 02:44 IST
TOPICSरास्ता रोको
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cpim stages rasta roko at ghoti