“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खोटे बोलण्याचा काम करतात, नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल बोलून गावातील गाव गुंडा बद्दल बोलल्याचं सांगत ते खोटं बोलत आहेत.” अशी टीका भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. एवढेच नाही तर ते काँग्रेसची प्रतिमा घालवण्याचा काम करत आहेत. तसेच, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा यांच्यामुळे जाण्याची वेळ आल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी बोलून दाखले.

गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही –

तसेच, “मी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तिथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं तिथे चारशे लोकांची उपस्थिती होती. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मी याविरोधात कोर्टात जाऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. गुन्हा दाखल झाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही.”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महात्मा गांधींवर प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा –

“काँग्रेसचे खासदार कोल्हे यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी म्हटले ते कलाकार म्हणून काम करताय, दुसरीकडं नाना पटोले म्हणतात आम्ही सिनेमा चालू देणार नाही. त्यामुळे हा राजकीय सिनेमा बंद करा, पटोले यांना महात्मा गांधींवर प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा.” असंही बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेसला उद्देशून म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अश्लिल नृत्याचे प्रकार उघडकीस येत आहे, या अवैध धंद्यांना ऊत आला आहे, बेकायदेशीरपणे सुरु असलेले धंदे, सट्टापट्टी याकडे पालकमंत्र्यांचा लक्ष नाही, पोलिसांनाही सगळ्या धंद्याची माहिती असून हफ्ते वसुली सुरू आहे.” असा आरोप केला. तसेच, शहराबाहेर फार्म हाऊसवर असे धंदे सुरू असल्याचेही ते म्हणाले.