शिवसेना सरस;भाजप, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
M K Stalin Says Modi Government is Fascist
LS Election 2024: “लोकशाहीसाठी ‘जिंका वा मरा’ अशी निवडणूक”, मोदी सरकार विरोधात स्टॅलिन यांचे रणशिंग!

दापोली नगरपंचायत निवडणुकीत यंदाही मतदारांनी त्रिशंकू’ कौल देत सर्वच पक्षांना बहुमतापासून वंचित ठेवले. मात्र या परिस्थितीत भाजप आणि काँग्रेसच्या भूमिकेवर सत्तेची गणितं बांधली जात आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला आठ, तर शिवसेनेला सात जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित दोन जागा मिळवून भाजपने शेवटचे स्थान मिळवले आहे.

मुळात या निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम, राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, भाजप जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या चढाओढीत शिवसेनेचं राजकारण उजवं ठरल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आघाडीत राष्ट्रवादीला ११ पकी फक्त चार जागा मिळाल्याने पक्षात नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या विजयी उमेदवारांमध्ये खालिद रखांगे, रवींद्र क्षीरसागर, नम्रता शिगवण, सचिन जाधव यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत एकमेव जागा मिळवणाऱ्या काँग्रेसने सहापकी चार जागा मिळवून स्वतची ताकद नव्याने सिद्ध केली आहे. यामध्ये अविनाश मोहिते, प्रशांत पुसाळकर, रजिया रखांगे, परवीन रखांगे यांनी विजयाचे शिखर गाठले. मात्र यामुळे आघाडीला बहुमतासाठी एक जागा कमी पडली आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेने सात जागांवर विजयाची मोहोर उठवत दापोलीतील सर्वात मोठय़ा पक्षाचा मान मिळवला आहे. यामध्ये उल्का जाधव, प्रकाश साळवी, परवीन शेख, मंगेश राजपूरकर, केदार परांजपे, कृपा घाग, शबनम मुकादम यांनी विजयाला गवसणी घातली. भाजपच्या जया साळवी आणि रमा तांबे यांनी अटीतटीच्या लढतीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही उमेदवार अनुक्रमे अकरा आणि बारा मतांच्या फरकाने निवडून आले.

गेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी सहा जागा मिळवून सरस ठरली होती. त्यावेळी तीन जागांवर अनपेक्षित विजय मिळवणाऱ्या मनसेचा भाव’ तत्कालिन त्रिशंकू सभागृहात चांगलाच वधारला होता. यंदा त्यांना एकही जागा मिळवण्यात यश आले नाही. गेल्या वेळेप्रमाणे यंदाही सभागृहात त्रिशंकूच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भाजपकडे सत्तेची सूत्रे आली असली तरी चार जागा मिळवणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांच्या भूमिकेकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. शिवसेनेला सतत विरोध करणारा भाजप राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या बाजूने जाणार की, सत्तेत मानाचं स्थान घेऊन शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.